शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व

भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे मामा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. तालुक्यात झालेले रस्ते तसेच पुलांच्या कामांमुळे दळणवळण वाढले आहे. नीरा नदीवर मामांच्या प्रयत्नामुळे खोरोची व बोराटवाडी येथे दोन पूल झाल्यामुळे पुणे व सोलापूर जिल्हाचा संपर्क वाढणार असून तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
- दादासाहेब भाळे
अध्यक्ष - सोनाली दूध उत्पादक संस्था
खोरोची, ता.इंदापूर

इंदापूर तालुक्यासाठी नीरा नदी वरदान ठरली आहे. नदीच्या एका बाजूला इंदापूर तालुका तर दुसऱ्या बाजूला माळशिरस तालुका वसला आहे. नदीकाठच्या गावातील अनेक शेतकरी बंधाऱ्यावरून ये-जा करीत असतात. खोरोची व बोराटवाडी परिसरामध्ये नीरा नदीवर पूल उभारावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून सातत्याने होत होती. पुलाच्या उभारणीसाठी गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही त्यात यश येत नव्हते. मात्र, मामांच्या पुढाकाराने पुलाचा प्रश्‍न मार्गी लागला.यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.


इंदापूर व माळशिरसमधील दळणवळण वाढणार
आमदार दत्तात्रेय भरणे मामांना शेतकऱ्यांच्या विकासाची नस माहीत आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मामा सातत्याने अहोरात्र झटत असतात. खोरोची मधून नातेपुतेला जाण्यासाठी जुना महादेव मार्ग होता. या मार्गाने पूर्वी मराठ्यावाड्यास अनेक नागरिक शिखर-शिंगणापूरला जात होते. सध्या खोरोचीमध्ये कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. त्यावरुन सध्या चालत, सायकल व दुचाकीने प्रवास करणे शक्य आहे. मात्र चारचाकी तसेच जड वाहनांना प्रवास करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. भरणे मामांनी खोरोचीमधील पुलासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या पुलाचे काम वेगात सुरू असून लवकर पूर्ण होईल. यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील दळणवळण वाढण्यास मोलाची मदत होणार असून शेतकऱ्यांना सोईस्कर होणार आहे.

बोराटवाडी पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर
मामांच्या प्रयत्नामुळे नीरा नदीवरील बोराटवाडीमधील पुलाचे काम युद्धपातळीर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या पुलामुळे बोराटवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांना अकलूज, माळशिरस येथे जाणे सोपे होणार आहे. या पुलामुळे वाहतुकीमध्ये वाढ होणार आहे.

रस्त्यांची कामे झाल्याने शेतकऱ्यांचा त्रास झाला कमी
मामांच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर तालुक्याच्या दक्षिण भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये खोरोची गावामधून ये-जा करीत असताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र खोरोची ते निरवांगी व खोरोची ते रेडणी रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत. तसेच खोरोची परिसरातील वाड्यावस्तीवरील रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होत आहे.

बीकेबीएन रस्त्यामुळे नागरिकांचे अर्थकारण बदलले
इंदापूर तालुक्यातून पुणे -सोलापूर, बारामती -इंदापूर व बावडा-बारामती असे तीन प्रमुख मार्ग गेले आहेत. यातील बीकेबीएन (बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर) हा मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. मामांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले असून, या रस्त्याने दररोज हजारो वाहने ये-जा करीत आहेत. तसेच दळणवळण वाढल्यामुळे नीरा नदीच्या काठच्या गावातील नागरिकांचे अर्थकारण बदलले आहे.

डाव्या कालव्याचे शेतीसाठी पाणी उपलब्ध
इंदापूर तालुक्यातील खोरोची परिसरातील १७ दाऱ्यावर शेतकऱ्यांना पूर्वी नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळत नव्हते. मामांच्या प्रयत्नामुळे गतवर्षीपासून कालव्याचे पाणी मिळू लागले आहे. चालू वर्षी पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
मात्र यापुढे या परिसरातील कालव्याचे पाणी मिळणार आहे.


२२ गावातील शेतकऱ्यांचा प्रश्‍न सोडविणार
इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.आमदार दत्तात्रेय भरणे मामा २२ गावातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २२ गावातील शेतकऱ्यांचा प्रश्‍न सुटल्यास निश्‍चित तालुक्याच्या विकासाला गती मिळेल.

नीरा नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीमुळे सुबत्ता
इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार दत्तात्रेय भरणे मामा यांनी प्रयत्न करून दुरुस्ती केल्यामुळे बंधाऱ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी साठा राहत असल्यामुळे नीरा नदीतील बंधाऱ्याच्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये गावामध्ये सुबत्ता आली आहे.

04253, 04254, 04255

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com