Pune News : पुण्यात आगीच्या घटनांची मालिका! दिवसभरात दुसरी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

Pune News : पुण्यात आगीच्या घटनांची मालिका! दिवसभरात दुसरी घटना

पुणे - मागील काही दिवसांपासून पुण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज दिवसभरात पुण्यातून आगीची दुसरी घटना समोर आली आहे. कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगर येथे भंगार मालाच्या गोडाउनमध्ये आग लागल्याचं समोर आलं आहे. (Pune Fire news in Marathi)

अग्निशमन दलाच्या ५ गाड्या तसेच २ टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.