Pune News : पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक; शंभरहून अधिकांवर गुन्हा दाखल

BJP Congress workers clash stone pelting Pune 2026 : पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. दगडफेकीत भाजप, काँग्रेस कार्यकर्ते, पोलिस आणि पत्रकार जखमी झाले. यावर भाजप-काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
BJP Congress workers clash stone pelting Pune 2026

BJP Congress workers clash stone pelting Pune 2026

sakal
Updated on

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपच्या वतीने काँग्रेस भवनासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांकडून भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com