
पुणे : आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक. माहितीपटाच्या माध्यमातून त्यांचा अनोखा रुपेरी प्रवास अनुभवण्याची संधी पुणेकरांना शनिवारी मिळाली. एका कन्येने आपल्या वडिलांना वाहिलेल्या या आगळ्यावेगळ्या आदरांजलीने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.