राणा आयुब यांना शिवीगाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचं एक ट्विट अन् गुन्हा दाखल

राणा आयुब यांना शिवीगाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचं एक ट्विट अन् गुन्हा दाखल

पुणे : सोशल मीडियावर महिलांना मोठ्या प्रमाणा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि त्यातही जर ती महिला सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी असेल तर मग अशा महिलांना मोठ्या प्रमाणावर शिविगाळ आणि धमक्यांचाही सामना करावा लागतो. पत्रकार आणि लेखिका असलेल्या राणा आयुब यांना देखील सोशल मीडियावर याच प्रकाराचा सामना करावा लागला आहे. राणा आयुब यांनी यासंदर्भात ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या त्या ट्विटची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आणि पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली. त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा याबाबत ट्विटरवरुन अवगत करुन दिलं होतं. त्यानंतर काही तासातच नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

राणा आयुब यांना शिवीगाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचं एक ट्विट अन् गुन्हा दाखल
'महाराष्ट्रात जे सुरुय त्याला सरकार म्हणता येईल का?'
राणा आयुब यांना शिवीगाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचं एक ट्विट अन् गुन्हा दाखल
Jio इन्स्टिट्यूटबाबत नीता अंबानींची मोठी घोषणा

राणा आयुब यांचं ट्विट रिट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, या प्रकारच्या सायबर बुलींगचा मी निषेध करते. सायबर बुलिंग हा सोशल मीडियावरील सध्या कळीचा मुद्दा बनला असून सरकारने त्यावर त्वरीत लक्ष घालावे. तसेच त्यांनी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी राणा अयुब यांचे ट्विट शेअर करत सायबर बुलिंगचा निषेध केला. सोशल मीडियावरील नेटिझन्सना याचा फार त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. राणा अयुब यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले होते. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी टॅग करण्यात आले होते.

राणा अयुब यांना सोशल मीडियावर सतत अश्लाघ्य भाषेत मेसेजेस पाठवले जात आहेत. जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सर्व धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर करुन राणा आयुब यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलीस या लोकांवर कारवाई करतील का? असा प्रश्न विचारला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याची लागलीच दखल घेत कारवाईचे आश्वासन दिलं. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आणि ज्या अकाऊंटवरुन शिवीगाळ करण्यात आली, त्यांचा शोध सध्या सुरु केला आहे. त्याच्याच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com