Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार; एकाच घरात तरुण तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार; एकाच घरात तरुण तरुणीची आत्महत्या

एका घरात तरुण आणि तरुणीची एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर परिसरात घडली आहे. राजू शेख (वय 31) आणि बरखा मंडल (वय 33) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघेजण कात्रज भागात राहायला आले होते. संतोषनगरमध्ये त्यांनी भाडेतत्वावर खोली घेतली होती. २५ डिसेंबरला बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. राजूने हॉलमध्ये फॅनला लटकून गळफास घेतला तर बरखाने बेडरूममधील फॅनला लटकून आत्महत्या केली आहे.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात बिकिनीवर ऑडिशन द्यायला लावून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आसपासच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. घरात कुठली ही सुसाईड नोट सापडली नाही. या घटनेप्रकरणी रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Pune Crime: 'पुणे मेट्रो'चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

टॅग्स :Pune Newscrimekatraj