आधार दुरुस्ती शिबिराचे दर शनिवारी आयोजन

आधार दुरुस्ती शिबिराचे
दर शनिवारी आयोजन
Published on

चिंचवड, ता. ९ ः भारतीय टपाल विभागाच्या पुणे शहर पूर्व विभाग पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध निवासी भागांमध्ये दर शनिवारी आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिरांचे आयोजन करणार आहे.
टपाल विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी निर्धारित शासकीय शुल्कात ही कामे करून देतील. यासाठी समाजसेवी संस्था, स्थानिक कार्यकर्ते व नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाईल. त्यामुळे नागरिकांना घराजवळच सेवा उपलब्ध होणार असल्याने खासगी केंद्रांवरील अतिरिक्त शुल्क व पायपीट टळेल. पिंपरी चिंचवड परिसरात अक्षयनगर-२, पिंपळे निलख येथील संकेत जगताप जनसंपर्क कार्यालय, जुनी सांगवीतील गणेश ढोरे जनसंपर्क कार्यालय तसेच हिंजवडी फेज ३ येथील मेगापोलिस सनवे सोसायटी येथे ही शिबिरे होतील, अशी माहिती विभागाचे प्रशासकीय अधिकारी समीर महाजन यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com