aadhaar server down
sakal
कात्रज - आधार पडताळणीसाठी आवश्यक ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक बिघाड आणि दस्त नोंदणीसंदर्भातील नवीन शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणीमुळे पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांतील कामकाजावर परिणाम होत आहे. हवेली क्र. २ आणि १२ यांसह शहरातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना दोन दिवस सोमवारी आणि मंगळवारी विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.