पुणे
आळेफाटा येथे कांदा १२० रुपये १० किलो
आळेफाटा, ता. ३ : आळेफाटा येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी (ता. १) कांद्याच्या १० हजार ८६७ पिशव्यांची आवक झाली आहे. एक नंबर गोळा कांद्याच्या दहा किलोला १२० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
बाजारात दोन नंबर कांद्यास ९० ते ११०, तीन नंबर गोल्टीस १७० ते ९०, चार नंबर बदला,चिंगळीला ३० ते ६०० रुपये बाजारभाव मिळाला,
अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
कांद्याला ५ ते १२ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असून, यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. बाजारभाव कमी मिळत असल्याने कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा सध्या कल वाढला आहे.

