आळे महाविद्यालयात
फूड फेस्टिवल

आळे महाविद्यालयात फूड फेस्टिवल

Published on

आळेफाटा, ता. २४ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे येथील वाणिज्य विभागामार्फत फूड फेस्टिवल उपक्रम पार पडला. या उपक्रमात वाणिज्य विभागातील सुमारे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सादर केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. पदार्थांच्या मांडणीतील कल्पकता, चव आणि स्वच्छतेची विशेष काळजी यावेळी घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण गुळवे तसेच प्रा. श्रीरामे यांनी कामकाज पाहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव उपस्थित होते. या फूड फेस्टिवलचे आयोजन वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. गिरी, डॉ. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. शिंदे यांनी मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com