Vidhan Sabha 2019 : पुण्यात पीएमपीने प्रवास करत भरला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

पुणे : आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी गुरुवारी पीएमपी बसने येऊन उमेदवारी अर्ज भरला. सोनावणे हे अपर इंदिरानगर येथून कुटुंबीय, कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बसने सणस मैदान येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले.

"सामान्यांबरोबर राहणारा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावे. मी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करेन', असे संदीप सोनवणे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The AAP Candidate fillled application form by Traveling trough PMPML bus at Pune in Maharashtra Vidhan Sabha 2019