गिरीश बापट, योगेश गोगावले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

पुणे : गिरीश बापट, योगेश गोगावले यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय कार्यालयापासून 100 मीटरच्या आत सभा घेतल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारारीची दखल घेत सभा न घेण्याचे आवाहन केले. 
 
आज पुण्यात इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करत, रॅली काढून निवडणुक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आज भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांची प्रचार रॅली सणस मैदान येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयजवळ घेण्यात आली आहे. 

याबाबत खासदार गिरीश बापट आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी निवडणूक निर्णय कार्यालयापासून 100 मीटर परिसराच्या आत सभा घेतल्याने त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार आपकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीकडे करण्यात आली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आपने केली आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस पाठवून सभा न घेण्याचे आवाहन केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP File Complaint Against Girish Bapat, Yogesh Gogawale for violation of Code of Conduct in Maharashtra Vidhansabha 2019