आपचे निलंबीत खासदार संजय सिंह रविवारी पुण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Singh

आपचे निलंबीत खासदार संजय सिंह रविवारी पुण्यात

पुणे - आम आदमी पार्टीने रविवारी (ता. ३१) पुण्यात राज्यस्तरीय युवक मेळाव्याचे आयोजन केले आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा पक्षाचा मनसुबा असून, जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांचाही शहर दौराही आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हे राज्यस्तरीय युवा अधिवेशन होत आहे. बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहातील अधिवेशनाबद्दल प्रदेश प्रवक्ता उत्तम पाटील सांगतात, ‘‘राज्यसभेतील आमची मुलूख मैदानी तोफ खासदार संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यभरातील युवकांचा पक्षातील सहभाग वाढविण्याबरोबरच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रचनात्मक कार्यक्रम उद्या निश्चित होणार आहे. या निमित्ताने तीन चार महत्त्वाच्या घोषणाही आम्ही करणार आहोत.’’

अधिवेशनाला युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, प्रदेश उपाध्यक्ष संदीप सोनवणे, प्रदेश प्रभारी दीपक सिंगला, निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे आणि प्रदेश संघटक विजय कुंभार आदी उपस्थित असणार आहे. आपच्या सर्व संघटना अधिवेशनाला उपस्थित असणार आहे. बिबवेवाडीत पार पडणाऱ्या अधिवेशनापूर्वी परिसरात पोस्टर लावण्यात आले आहे.

Web Title: Aaps Suspended Mp Sanjay Singh In Pune On Sunday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top