Video : मानधन वाढीसाठी 'आशा'ची आर्त हाक

Aasha employees march to the collectors office in Pune
Aasha employees march to the collectors office in Pune

पुणे : महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती तर्फे हजारो महिलांनी मासिक मानधन वाढीसाठी पुणे स्टेशन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी महिलांना कामावर आधारित मोबदला धरून सध्या अडीच हजार मानधन मिळत आहे. त्यांचे हे मानधन तिप्पट वाढविण्याची राज्य सरकारने वेळोवेळी घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात या महिलांना मानधन वाढ देण्यात आलेली नाही. तसेच राज्य सरकारने तिप्पट वाढ पुरेशी नसुन आंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांना 15 ते 20 हजार रूपये वेतन देण्याची मागणी करण्याता येत आहे. या मागणीसाठी राज्यातील सर्व जिल्हात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी आंदोलन करीत आहेत.

सोमवारी पुणे जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com