फातिमानगर येथील आशा शिंदे आजींनी जपलाय ५५ वर्षापासून डायरी लिहिण्याचा छंद

दैनंदिनी लिहिणे हा अनेकांचा छंद असतो. विशेषतः तरूणाई यामध्ये प्रामुख्याने पुढे असलेली पाहवयास मिळते.
Aasha Shinde
Aasha ShindeSakal
Summary

दैनंदिनी लिहिणे हा अनेकांचा छंद असतो. विशेषतः तरूणाई यामध्ये प्रामुख्याने पुढे असलेली पाहवयास मिळते.

हडपसर - दैनंदिनी लिहिणे हा अनेकांचा छंद असतो. विशेषतः तरूणाई यामध्ये प्रामुख्याने पुढे असलेली पाहवयास मिळते. मात्र, फातिमानगर येथील आशा शिंदे (aaasha shinde) या आजींनी अर्धशतकाहून अधिक काळ हा छंद (hobby) जोपासला आहे. येत्या नववर्षापासून त्या आपली ५५ वी दैनंदिनी (Diary Writing) लिहिण्यास सुरुवात करीत आहेत.

१९६७ साली शरद पवारांच्या भगिनी सुनीता जगताप यांनी दिलेल्या पहिल्या डायरीपासून त्यांनी दैनंदिनी लेखनाची सुरुवात केली. आपले आजोबा आणि वडील यांना असलेली रोजच्या कामाची व हिशेबाची नोंद ठेवण्याची सवय त्यांनाही जडली. आपल्या विवाहानंतर त्यांनी आजपर्यंत अखंड हा छंद जोपासला आहे.

सुरूवातीला हिशेब, फोन नंबर, पत्ते नोंदवत त्यांनी दैनंदिनी लेखनाची सुरूवात केली. पुढे पुढे अनुभव, आत्मानुभव व चांगल्या वाईट स्मृतींच्याही नोंदी त्या करू लागल्या. पती दत्ताजी शिंदे यांचे क्रीडा साहित्य विक्रीचे दुकान होते. तेथे स्थानिक खेळाडूंसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू येत असत. त्यांच्या नोंदीही दैनंदिनीत अढळतात.

Aasha Shinde
वाबळेवाडी शाळा : वारे यांच्या निलंबनाची मागणी माझी नाहीच!

जशी दैनंदिनी लिहायला सुरुवात केली तेंव्हापासून आतापर्यंतच्या सर्व दैनंदिनी श्रीमती शिंदे यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यांची वाचकांची पत्रे सकाळसह विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. यासाठी त्यांना या दैनंदिनींचा खूप उपयोग झाला असल्याचे त्या सांगतात.

त्यांच्या या छंदाबाबत श्रीमती शिंदे म्हणाल्या, "वैवाहिक जीवनापासून दैनंदिनी लिहिन्याची सवय मला लागली. येत्या वर्षापासून ५५ वी दैनंदिनी मी लिहिणार आहे. पती निधनानंतर व मुले परदेशात असल्याने ही दैनंदिनीच माझी सखी झाली आहे. सतत जवळ असते.निर्जीव असूनही बोलकी वाटते. वृध्दापकाळात मेंदूला व हाताला चालना मिळून चांगला शारिरीक व मानसिक व्यायाम त्यामुळे होत आहे. वाटेल तेंव्हा कोणतीही दैनंदिनी उचकून गतकाळातील आठवणींना उजाळा देता येतो. त्यामुळे आनंद व समाधान मिळते. एकटेपणा कधी जाणवत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com