सांगली : आटपाडीत डाळिंब सौदे बाजारसह समितीत ५.५० कोटींची कामे मंजूर

सांगली : आटपाडीत डाळिंब सौदे बाजारसह समितीत ५.५० कोटींची कामे मंजूर
Published on

आटपाडी बाजारासह समितीत
५.५० कोटींची कामे मंजूर

डाळिंब सौदे सुरू; सभापती संतोष पुजारी यांची माहिती

ॲग्रोवन वृत्तसेवा
आटपाडी, जि. सांगली : आटपाडी बाजार समितीअंतर्गत डाळिंब सौदे बाजार आणि बाजार समिती परिसरातील तब्बल साडेपाच कोटींची विकास कामे मंजूर झाली आहेत. एक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कामांचा प्रारंभ २९ ऑगस्ट रोजी केला जाणार असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली.
आटपाडी समितीअंतर्गत करगणी, खरसुंडी आणि दिघंची येथे उपबाजार आहेत. सहा दिवस डाळिंबाचा सौदे बाजार व एक दिवस शेळ्यामेंढाचा बाजार भरतो. डाळिंब बाजारात रोज २५० ते ३५० टन दरम्यान डाळिंबाची आवक होते. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी येतात. डाळिंब खरेदीनंतर ते पॅकिंग करण्यासाठी अपुरी जागा असल्यामुळे २२ लाखांच्या दोन नवीन पॅकिंग हाऊसची उभारणी केली जाणार आहे. डाळिंब संकुलासमोर पेव्हिंग ब्लॉक, गटाराचे सव्वा कोटींचे काम आहे. २३ लाखांतून संपूर्ण बाजार समिती, डाळिंब सौदे बाजारात सौर ऊर्जेवर वीज पुरवठ्यासाठी २३ लाखांच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दिघंची उपकेंद्रातील सौर ऊर्जा प्रकल्पाची १३ लाखांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २७ लाखांचे आटपाडीत, दिघंची येथे २७ लाखांचे ८० टन क्षमतेचे वे ब्रिज उभारले जाणार आहे. दिघंची उपबाजारात एक कोटी ३२ लाखाचे वेअर हाऊस बांधले जाणार आहे. सध्या असलेली स्वच्छतागृहाची सुविधा अपुरी पडत असल्यामुळे नवीन २५ लाखांतून स्वच्छतागृहाचे युनिट उभारले जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मंत्री शंभूराज देसाई, आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या हस्ते कामांचा प्रारंभ केला जाणार आहे. एक कोटी ६८ लाखांच्या शेतकरी भवनला मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Foreign Investment
Manchar Farmer Accident Insurance Scheme
Devendra Fadanvis News
Maharashtra pomegranate price latest update
Marathi News Esakal
www.esakal.com