
वाघोली : आईने एक दिवसाच्या जिवंत बाळाला सरळ एका इमारतीच्या पायऱ्यांवर बेवारस टाकून दिले. बाळ रक्ताने माखले होते. नाळेतून रक्त येत होते. खराडी पोलिसांना ही घटना कळली. महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी त्याला आईच्या मायेचा स्पर्श दिला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून स्तनपान दिले. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली आहे.