Pune News: बेवारस वाहने रस्त्यांवर धूळ खात; महापालिका प्रशासनालाच पडला राबविलेल्या मोहिमेचा विसर

Municipal Corporation’s Drive Against Abandoned Vehicles Stalled: पुणे शहरातील रस्त्यांवर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीची समस्या, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यावर धोका वाढत आहे. महापालिका व पोलिसांनी 2025 मध्ये मोहीम राबवली होती, मात्र ती थांबल्याने पुन्हा हजारो वाहने रस्त्यांवर दिसत आहेत. लवकरच संयुक्त कारवाई करून ही वाहने हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: अनधिकृत फ्लेक्‍स, बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण एकीकडे सुरू असतानाच शहरातील प्रत्येक रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे विद्रूपीकरणात आणखी भर पडत आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने मागील वर्षी बेवारस वाहनांविरुद्ध ठोस कारवाई केली. मात्र, त्यानंतर प्रशासनास बेवारस वाहनांविरुद्धच्या कारवाईचा विसर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यांवर धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांवर कारवाईला केव्हा मुहूर्त मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com