Abeda Inamdar Senior College: आबेदा इनामदार सिनियर कॉलेजने आंतर-महाविद्यालयीन अभिरूप संसद स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

Abeda Inamdar Senior College: राज्यशास्त्र विभाग, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे 05 तर्फे शनिवार, 9 मार्च 2024 रोजी आंतर-महाविद्यालयीन मॉक संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Abeda Inamdar Senior College
Abeda Inamdar Senior CollegeSakal

Abeda Inamdar Senior College: राज्यशास्त्र विभाग, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे 05 तर्फे शनिवार, 7 मार्च 2024 रोजी आंतर-महाविद्यालयीन मॉक संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्देश लोकशाही मुल्य शिक्षण, संसदीय कामकाजाचा अनुभव आणि विधिमंडळाविषयीच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा आहे. विद्यार्थ्यांमधील संभाषण आणि वादविवाद कौशल्य वाढवणे हे देखील यामागे उद्दिष्ट होते.

राज्यशास्त्र विभाग, एम. सी. ई. सोसायटीचे आबेदा इनामदार सिनियर कॉलेज ने आंतर-महाविद्यालयीन अभिरूप संसद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आबासाहेब गरवारे कॉलेजला द्वितीय क्रमांक आणि मॉडर्न कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला. फर्ग्युसन कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

Abeda Inamdar Senior College
Abeda Inamdar Senior CollegeSakal

मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शाहीदा शेख यांनी आंतर-महाविद्यालयीन अभिरूप संसद स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा दिली. सहाय्यक प्राध्यापक शबाना शेख, सहाय्यक प्राध्यापक अली माळेगावकर आणि सहाय्यक प्राध्यापक एजाज बागवान यांनी विद्यार्थ्यांचा सराव घेतला आणि मार्गदर्शन केले.

राज्यशास्त्र विभाग, एम. सी. ई. सोसायटीचे आबेदा इनामदार सिनियर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल एम. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार आणि आबेदा इनामदार सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ शैला बुटवाला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Abeda Inamdar Senior College
Pune Metro : महिलांच्या हाती स्टिअरिंग! ;प्रतीक्षा माटे आणि पूजा काळे यांना मिळाला बहुमान

सत्ताधारी पक्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आलीया बागवान यांना आणि विरोधी पक्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बुशरा शेख यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले.

हुमेरा, अरफा, गिप्स, एनामुल हुसेन, अहद, सृष्टी, रमिझा, राहुल, फाजिल, श्रावणी, इस्रा,, आमेन, मुस्कान शहा, अफवान, बुशरा, अफरोज, आफताब कुरेशी, आफताब आलम, मुस्कान निजाम, परवेज, आलिया सदफ, देवयानी, अहमद यासीन, मुस्कान शेख, अमरीन, युसैरा, आयशा, अर्शिया, फिझा, साहेबा, गौसिया आणि मोहम्मद फारूक यांनी आंतर-महाविद्यालयीन अभिरूप संसद स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला.

Abeda Inamdar Senior College
International Women's Day : जागतिक महिला दिनी कष्टकरी महिलांची दखल घेण्याची गरज

विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला ट्रॉफी आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आंतर-महाविद्यालयीन अभिरूप संसद स्पर्धेत पुणे शहरातील आठ कॉलेज सहभागी झाले होते. यात मॉडर्न कॉलेज, आबासाहेब गरवारे कॉलेज, आबेदा इनामदार कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, हरिभाऊभाई देसाई कॉलेज, सर परशुरामभाऊ कॉलेज, पूना कॉलेज आणि वाडिया कॉलेज यांनी सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com