
आंबेठाण : ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोरेगाव खुर्द ( ता.खेड ) येथील अभिमन्यू शरद बुटे याने इयत्ता सहावी ते आठवी गटात सलग दुसऱ्या वर्षी खेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी चाकण येथे पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनात अभिमन्यू याने सादर केलेल्या गर्ल्स सेफ्टी शूज या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.