

Illegal Drug Trade: Notorious Criminal Arrested for Selling Banned Injections in Hadapsar
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : आठ दिवसात जर गोळे वस्ती उरुळी कांचन येथील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपड्यांची नोंद करून ग्रामपंचायतीने "आठ अ" चे उतारे दिले नाहीत तर पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचे नेते भगवान वैराट यांनी आज उरुळी कांचन येथे मोर्चा नंतर प्रशासनाशी चर्चा करताना दिला.यावेळी गटविकास अधिकारी शेखर शेलार,ग्रामपंचायत प्रशासक मिलिंद जगताप,ग्रामपंचायत अधिकारी टी.एस.पाटील,झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचे आबा चव्हाण,दत्ता डाडर, दिगंबर मोहिते आदींसह झोपडपट्टी धारक नागरिक उपस्थित होते.