अभय ओझर्डे यांचे आय ए एस यश

अभय ओझर्डे यांचे आय ए एस यश

Published on

वाईच्या अभिषेक ओझर्डेंची
आयएएस पदाला गवसणी

देशात ३३६ वी रँक मिळवत स्वप्न केले साकार

भुईंज, ता. ६ : वाई येथील अभिषेक अभय ओझर्डे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत देशात ३३६ वी रँक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सध्या ते सहाय्यक आयुक्त महसूल विभाग कस्टम ॲण्ड इनडायरेक्ट टॅक्सेस यासाठी प्रशिक्षण
घेत असून, प्रशिक्षण कालावधीतच त्यांनी ही परीक्षा देत पुन्हा एकदा आयएएस या पदावर पोहोचल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
त्यांचे मूळ गाव देऊर (ता. कोरेगाव) असून, त्यांच्या आई मनीषा प्राथमिक शिक्षिका, तर वडील ग्रामपंचायत अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळूर येथून एमबीए, तसेच सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक पदवीचे शिक्षण घेतले आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६६९ वी रॅक मिळवली होती. त्यांचे स्वप्न हे आयएएस होण्याचे असल्याने त्यांनी सतत प्रयत्न सुरू ठेवून प्रशिक्षण कालावधीतच हे यश संपादन करून एक आदर्श उभा केला आहे. त्यांचे वडील अभय ओझर्डे हे वाई पंचायत समितीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांनीही स्पर्धा परीक्षेतून पोलिस दलात काम करण्याचे स्वप्न पाहिले होते; परंतु ते महसूल विभागात गेले. मात्र, आपल्या मुलाला त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
लवकरच पाचवड येथे दिवंगत आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेमध्ये अभिषेक ओझर्डे यांचा सत्कार सोहळा व मुलाखत होणार असल्याची माहिती जयवंत पवार, राहुल तांबोळी व जयवंत पिसाळ यांनी दिली.
ओझर्डे कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यासाठी तालुक्यातील मित्र परिवार यांनी शुक्रवारी सायंकाळी वाई येथे गर्दी केली होती, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

----------------------------

01466
अभिषेक ओझर्डे
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com