जातपडताळणी समिती रद्द करा; मनोज जरांगेंची मागणी

जातपडताळणी समिती रद्द करा; मनोज जरांगेंची मागणी
Published on

‘जातपडताळणी समिती रद्द करा’

जालना, ता. २९ : जातपडताळणी समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनोज जरांगे यांनी आता जातपडताळणी समितीच रद्द करण्याची मागणी केली. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
जातवैधतेसाठी समितीला २० ते ३० हजार रुपये द्यावे लागत असल्याचा गंभीर आरोप करत यामध्ये मराठ्यांसह ओबीसी, एससी, एसटी या सर्वच जातींतील गरिबांचे मरण होत असल्याचे जरांगेंनी सांगितले. दरम्यान, सक्षम असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे पूर्ण कागदपत्रे पाहिल्याशिवाय जात प्रमाणपत्र देत नाहीत, तरीही जातपडताळणी समिती प्रमाणपत्र रद्द का करते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करून मराठा समाजाचे नुकसान केल्याचा आरोप केला. कुणबी नोंदीच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज लोकांनी केले, अधिकारी मात्र याकडे लक्ष देत नाही. सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती गठित केली, त्यावेळी ५८ लाख नोंदी सापडल्या. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव मोठे होऊ नये, यासाठी सरकारमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचे जरांगे म्हणाले.

महाराष्ट्रात समिती कशासाठी?
इतर राज्यांमध्ये जातपडताळणी समिती अस्तित्वात नसल्याचे आपल्याला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच सांगितले होते, असा दावा जरांगेंनी केला. जर इतर राज्यांत अशी समिती नाही, तर महाराष्ट्रातच जातपडताळणी समिती कशासाठी ठेवण्यात आली, असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com