esakal | अनुजा जोशी यांनी जतन केल्या सुमारे १०० वर्षे जुन्या वस्तू
sakal

बोलून बातमी शोधा

अनुजा जोशी यांनी जतन केल्या सुमारे १०० वर्षे जुन्या वस्तू

अनुजा जोशी यांनी जतन केल्या सुमारे १०० वर्षे जुन्या वस्तू

sakal_logo
By
अक्षता पवार @Akshataspawar

पुणे : ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे वाडवडिलांनी वापरलेल्या साधारणपणे १०० वर्षे जुन्या वस्तूंचे जतन करण्याचा छंद जपतात ५७ वर्षांच्या अनुजा जोशी. तर जुन्या बाजारात जाऊन ऐतिहासिक वस्तू विकत आणण्याऐवजी त्यांच्याकडील असलेल्या या वस्तूंचे केवळ जतनच नाही तर त्यांचा कलात्मक पद्धतीने वापर सुद्धा अनुजा करतात.

पौड रस्ता येथील अनुजा या त्यांचे पती अनंत जोशी यांच्यासमवेत राहतात. आपल्या छंदाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘ऐतिहासिक वास्तू त्यातील वस्तूंची मला पहिल्यापासूनच आवड आहे. सदाशिव पेठेत आमचा वाडा होता व त्याला पाडल्यानंतर त्यातील काही वस्तू माझ्याकडे आल्या. तर त्या वस्तूंना जतन करून ठेवण्याचा छंद मला जडला. यामध्ये कमळाच्या आकाराचा केनचा सोफा, माझा बारशाला मिळालेला चांदीचा खुळखुळा, पितळेच्या वस्तू, पितळी फुलं असलेले लाकडी पार, आजोबांच्या लिखाणाचा डेस्क, फिरकीचा तांब्या, भातुकलीचा खेळ, पुस्तके अशा वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश आहे. कित्येक लोकांकडे अशा वस्तू असतात पण त्या माळावर किंवा घरातच धूळ खात पडलेल्या असतात. जुन्या वस्तूंचे केवळ जतन करणे इतक्या पुरते न थांबता या सर्व वस्तूंचा कलात्मक स्वरूपात वापर करत घराची सजावट करते. कोरोना काळात बाहेर जाने, फिरणे किंवा नातेवाइकांना भेटणे शक्य नवते. तसेच घरात वेल कसा घालवायचा हा प्रश्‍न अनेकांसमोर निर्माण झाला होता. मात्र माझा संपूर्ण वेल या वस्तूंना विविध पद्धतीने सजविणे, त्यांची साफसफाई करण्यात जात होता.’’

लोकमान्य टिळकांचे १९१५ मध्ये प्रकाशित झालेले गीतारहस्य या पुस्तकाचे जतन केले आहे. या कठीण काळात दररोज गीतेतील एक अध्याय वाचणे तसेच गीतेचे ऑनलाइन क्लासेस घेणे हा रोजचा दिनक्रम. यामुळे निराशा येता नाही आणि सकारात्मक, आनंदी राहायला मदत होते. असे ही जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा: महामेट्रोच्या कार्यपद्धतीवर पुण्यात रिक्षा पंचायतीचे आक्षेप

''सध्या माझा दोन्ही मुली या परदेशात राहतात. परंतु त्यांनी देखील भविष्यात या वस्तूंचे जतन करावे अशी इच्छा आहे. या केवळ वस्तू नाही तर, या सर्व वस्तूंमध्ये आठवणींचा अनमोल खजिना दडला आहे. तसेच परिवाराच्या पुढील पिढीला देखील या गोष्टी पाहता येतील. जतन केलेल्या अनेक वस्तू या ऐतिहासिक काळातल्या आहेत. त्यामुळे इतरांना देखील त्या पाहता याव्यात म्हणून याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर नक्कीच या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येईल.''

- अनुजा जोशी

loading image