esakal | पुणे जिल्ह्यातील तब्बल 130 गावांना दूषित पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यातील तब्बल 130 गावांना दूषित पाणी

पावसामुळे नद्या-नाल्यांना आलेला पूर आणि गढूळ पाण्यामुळे पुणे जिल्ह्यातील 130 गावांमधील पिण्याचे पाणी दूषित झाल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील तब्बल 130 गावांना दूषित पाणी

sakal_logo
By
गजेंद्र बडे


पुणे ः पावसामुळे नद्या-नाल्यांना आलेला पूर आणि गढूळ पाण्यामुळे पुणे जिल्ह्यातील 130 गावांमधील पिण्याचे पाणी दूषित झाल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. तसेच, 13 गावांमधील पाण्यातील क्‍लोरीनचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांहून कमी असल्याचे आढळून आले आहे.

खेड तालुक्‍यातील सर्वाधिक 18 गावांमधील, तर सर्वांत कमी वेल्हे तालुक्‍यातील तीन गावांमधील पाणी दूषित झाले आहे. दरम्यान, क्‍लोरीनचे प्रमाण कमी असलेल्यांमध्ये सर्वाधिक सहा गावे जुन्नर तालुक्‍यातील आहेत. त्यापाठोपाठ भोर तालुक्‍यातील पाच गावांचा आणि बारामती तालुक्‍यातील दोन गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये दंडवाडी व आंबी (दोन्ही ता. बारामती), वरोडी बुद्रुक, राजघर, वेळवंड, महुडे खुर्द, गावडी (सर्व ता. भोर) आणि अलदरे, जलवंडी, पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, माणिकडोह आणि निरगुडे (सर्व ता. जुन्नर) आदींचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गावांमधील मिळून पाण्याचे दोन हजार 918 नमुने तपासले. या तपासणीसाठी प्रत्येक गावातून किमान दोन नमुने घेण्यात आले होते. यापैकी 259 नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले.

loading image
go to top