बापरे! पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण पोहचले ५० हजारांजवळ

Corona-Patient
Corona-Patient
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी (ता.२५) पन्नास हजारांच्या जवळ पोचली आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ७१० झाली आहे. यामध्ये गेल्या २४ तासातील ६ हजार ४३२ नवीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसांतील एकूण रुग्णांत शहरातील ३ हजार २८६ जण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील २३ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ८११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९७२, नगरपालिका क्षेत्रात २७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ८४ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसभरात २ हजार ८०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार २००, पिंपरी चिंचवडमधील ७२२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७९५, नगरपालिका हद्दीतील ८१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १० जण आहेत.

सद्यःस्थितीतील एकूण सक्रिय रुग्णांपैकी १० हजार २७० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. याशिवाय ३९ हजार ४४० जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३ हजार १२२, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३ हजार चार, नगरपालिका हद्दीतील १ हजार ६३४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २७५ रुग्ण आहेत.

दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये शहरातील सर्वाधिक २३ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद हद्दीतील सहा आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com