esakal | पुणे : हवेलीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पोहोचला सव्वादोनशेवर...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Patient

- हवेलीत गुरुवारी दिवसभरात उच्चांकी 59 कोरोनाबाधित रुग्ण.

- ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा पोचला सव्वादोनशेवर. 

पुणे : हवेलीत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा पोहोचला सव्वादोनशेवर...

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्यात गुरुवारी (ता. २) दिवसभरात रुग्णांच्या आकडीवारीने उच्चांक गाठला असून, दिवसभरात तब्बल ५९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. यामुळे हवेलीमधील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा सव्वादोनशेवर पोचला आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पूर्व हवेलीत दिवसभरात 59 विक्रमी रुग्ण आढळून आले तरी, मागील 7 दिवसांपासून कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनलेल्या पूर्व हवेलीला गुरुवारी दिवसभरात अपवाद वगळता दिलासा मिळाला आहे. पूर्व हवेलीमधील वाघोली 7 व मांजरी बुद्रुक 6 वगळता केवळ लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत दिवसभरात एकच रुग्ण आढळून आला आहे. पश्चिम हवेलीच्या पट्ट्यात मात्र गुरुवारी दिवसभर कोरोनाने थैमान घातल्याचे कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीवरुन आढळुन आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, हवेलीत गुरुवारी दिवसभरात वाघोली (सात), नऱ्हे (पाच), देहू (दोन), नांदेड (आठ), किरकीटवाडी (एक), कोढंवे-धावडे (एक), न्यु कोपरे (चौदा), खानापुर (आठ), खेड-शिवापुर (तीन), गुजर-निंबाळकरवाडी (चार), व मांजरी बुद्रुक (सहा) असे एकोनसाठ रुग्न आढळुन आल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

हवेली तालुक्यातील गावनिहाय ऍक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी...

लोणी काळभोर (८), मांजरी बुद्रुक (३८), कदमवाकवस्ती (१३), नांदेड (१०), किरकीटवाडी (६), नऱ्हे (१४), खडकवासला (३), वाघोली (१२), मांजरी खुर्द (१), खानापुर (३२), डोनजे (१), घेरा-सिंहगड (१), औताडे-हांडेवाडी (१), वडकी (३), शेवाळेवाडी (१२), भिलारवाडी (१२), गुजर-निंबाळकरवाडी (८), खेड-शिवापुर (४), उरुळी कांचन (६), कोंढवे-धावडे (८), न्यु कोपरे (२१), बकोरी (१), कुंजीरवाडी (१०), थेऊर (६), सोरतापवाडी (१), शिरसवाडी (१) व देहु (१२). 

विनामास्क फिरणाऱ्या शंभर जणांवर कारवाई

लोणी काळभोर पोलिसांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने गुरुवारी (ता. २) दिवसभर विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या शंभरहुन अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उरुळी कांचन हद्दीत ग्रामपंचायत प्रशासन यांनी संयुक्तपणे ७३ जनांच्यावर कारवाई करून 18,300/- रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत सरपंच राजत्री वनारसे उपसरपंच भाऊसाहेब कांचन व पोलिस शिपाई सचिन पवार यांनी भाग घेतला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतही विनामास्क घराबाहेर पडणाऱ्याच्या विरोधात कारवाई केली.

दरम्यान, विनामास्क घराबाहेर पडणारे व सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी सांगितले.

loading image