पुणे जिल्ह्यात दिवसभरामध्ये 3628 नवे कोरोना रुग्ण; 95 रुग्णांचा मृत्यू  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे  जिल्ह्यात दिवसभरामध्ये 3628 नवे कोरोना रुग्ण; 95 रुग्णांचा मृत्यू 

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी (ता.24) रात्री नऊपासून शुक्रवारी (ता.25) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. दिवसभरात 3 हजार 695 कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यात दिवसभरामध्ये 3628 नवे कोरोना रुग्ण; 95 रुग्णांचा मृत्यू 

पुणे- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण 3 हजार 628 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील 1 हजार 621 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये 856, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 854, नगरपालिका क्षेत्रात 234 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 63 नवे रुग्ण आढळून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील सर्वाधिक 39 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी 23, नगरपालिका क्षेत्रातील 4 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी (ता.24) रात्री नऊपासून शुक्रवारी (ता.25) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. दिवसभरात 3 हजार 695 कोरोनामुक्त झाले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top