crime
Esakal
पुणे - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अभाविपचा कार्यकर्ता मल्हार नीलेश पाटील (वय १९) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, सागर धाडवे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.