पुणे - पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील ‘नो व्हेईकल झोन’मुळे वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवतींना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राज्य सहकारी बँकेने एक आधुनिक ‘ई-बस’ मंदिर समितीस दिली आहे. ‘सहकार भक्ती-रथ’ या वातानुकूलित बसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (ता. ५) पंढरपूर येथे होणार आहे.