पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला पुन्हा वेग

एकीकडे ओमिक्रॉन वाषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झालेले असताना, याच कालावधीमध्ये नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

पुणे - एकीकडे ओमिक्रॉन वाषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झालेले असताना, याच कालावधीमध्ये नागरिकांचे लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात रोज २० हजार पेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे.

शहरात जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. सुरवातीचे चार पाच महिने लसीकरण अतिशय संथ गतीने सुरू होते. याच काळात कोरोनाची दुसरी लाट असल्याने लसीकरणावरून मोठा गोंधळ ही झाला. जुलै महिन्यापासून शासकीय लस मुबलक उपलब्ध होत असल्याने तेव्हापासून लसीकरण सुरळीत झाले आहे. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यात सर्वाधिक लसीकरण झाल्याने पुण्याने २३ आॅक्टोबर रोजी ५० लाखाचा टप्पा पूर्ण केला. दरम्यान १० लाखाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पाच महिने लागले होते. तर पुढील ४५ लाख जणांचे लसीकरण सहा महिन्यात झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Corona Vaccination
काँग्रेसचे मुखपत्र 'शिदोरी' मासिकाचे संपादक डॉ. महाजन यांचा राजीनामा

सप्टेंबर महिन्यात शहरातील ३० लाख पेक्षा जास्त नागरिकांचा पहिला डोस झाल्याने महापालिकेचे अपेक्षीत लक्ष पूर्ण झाले. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यापासून लसीकरणाचे प्रमाण कमी होऊन, या महिन्यात बहुतांश दिवस २० हजार पेक्षा कमी लसीकरण झाले. पण गेल्या आठवड्यापासून २० हजार पेक्षा जास्त लसीकरण होत आहे. सप्टेंबर महिन्यात सुमारे १२ लाख डोस दिले गेले. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त होती, या नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्याने हे नागरिक आता दुसऱ्या डोसचे लसीकरण करून घेत आहेत, असे महापालिकेकडून सांगितले जात आहे.

गेल्या सहा दिवसात झालेले लसीकरण

२६ नोव्हेंबर

पहिला डोस - ४५२७

दुसरा डोस - १५५२६

एकूण - २००५३

२७ नोव्हेंबर

पहिला डोस - ६१७३

दुसरा डोस - २०७१२

एकूण २६८८५

२८ नोव्हेंबर (रविवार)

पहिला डोस - १०६१

दुसरा डोस - २८३९

एकूण - ३९००

२९ नोव्हेंबर

पहिला डोस - १२८९५

दुसरा डोस - २६०२२

एकूण - ३८९१७

३० नोव्हेंबर

पहिला डोस - १४२४७

दुसरा डोस - २५६८१

एकूण - ३९९२८

१ डिसेंबर

पहिला डोस - ७४०५

दुसरा डोस - १४०५६

एकूण - २१४६१

‘सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले, त्यामुळे ८४ दिवसानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढत आहे. सध्या ओमिक्रॉन विषाणूबद्दल काळजी घेतली जात असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी.’

- डॉ. सूर्यकांत देवकर, प्रमुख लसीकरण अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com