
पुणे : मोटार अपघातात झालेली जीवितहानी किंवा दुखापतीसंदर्भातील दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातील काही दावे विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे आता मध्यस्थीच्या माध्यमातून हे दावे निकाली काढले जात आहेत. तक्रारदार व विमा कंपनी चर्चा करून परस्पर सहमतीने प्रकरण मिटवण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे प्राधिकरणात दाखल होत असलेले सुमारे ६० टक्के दावे चर्चेतून निकाली निघत आहेत. यात मध्यस्थ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.