Pune News: पुण्यात बैलगाडा शर्यतीवेळी दुर्घटना; घटनेत एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

पुण्याजवाळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले होते
Pune News
Pune NewsEsakal

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील रामदऱ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून एकाचा मृत्यु झाल्याची घटना काल (रविवारी) सायंकाळी घडली आहे. तर या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.(Latest Marathi News)

बाळासाहेब काशीनाथ कोळी (वय ४६, रा. निनाम पाडळी, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर या दुर्घटनेत शुभम विजय लोखंडे (वय २४), मयूर प्रमोद लोखंडे (वय २५), विकास वाल्मिक ढमाळे (वय २४, रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे.(Latest Marathi News)

Pune News
Pune NewsEsakal
Pune News
Odisha Train Accident: बेपत्ता लोकांबद्दल बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रडू कोसळले, Video

याघटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आलं होतं. काल सायंकाळी या शर्यतीवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.(Latest Marathi News)

या कार्यक्रमादरम्यान सोसाट्याच्या वारा सुटला त्यामुळे स्टेज कोसळला आणि आडोशाला थांबलेले कोळी, लोखंडे, ढमाळे यांच्या अंगावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्टेज कोसळल्यानंतर परिसरात धावपळ उडाली.(Latest Marathi News)

Pune News
Nagpur Accident: नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब कोळी यांच्यासह शुभम लोखंडे, मयूर लोखंडे, विकास ढमाळे यांना त्वरीत हडपसर भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच बाळासाहेब कोळी यांचा मृत्यू झाला.

Pune News
समांतर जलवाहिनीचे काम थांबवले; ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका; ‘उजनी’च्या अभियंत्यांचे मनपा आयुक्तांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com