पद्मावतीमाता चौकात बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात सदृश्यस्थिती

वाहनचालकांचा गोंधळ : गतिरोधक, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक बसवावेत
Accident-like situation due to unruly drivers in Padmavatimata Chowk
Accident-like situation due to unruly drivers in Padmavatimata Chowk

उंड्री - कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गावर पिसोळीतील पद्मावतीमाता चौकात बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडी होऊन अपघातसदृशस्थिती निर्माण होते. धर्मावत पेट्रोल पंपाजवळील चौकात दुभाजक, रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक आणि गतिरोधक नसल्याने नवख्या वाहनचालकांचा रात्री-अपरात्री गोंधळ उडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

बायपास मार्गावरील ड्रेनेजची चेंबर रस्त्याच्या उंचीपासून खाली असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी कोलमडून अपघात होत आहे. दुभाजक, चौकामध्ये रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक, चौकाजवळ बायपास मार्गाच्या दोन्ही बाजूला शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक उभारणे अत्यंत गरजेचे आहे, असा अश्विनी जाधव, गीता कश्यप, सविता हागवणे, रेणुका भिंताडे, जयश्री पारवे, जालिंदर वाघमारे, चंद्रकांत काळे, मेधा कुलकर्णी, संदीप कांबळे, गोविंद मिसारे यांनी सूर आळवला आहे.

पिसोळीतील पद्मावती मंदिर येथे मोठा उतार असून, चेंबरमधून वारंवार पाणी वाहत असल्याने दुचाकी घसरते, रस्त्याच्या खाली असलेले चेंबर दुचाकीचालकांसाठी यमदुतच ठरत आहेत. रात्रीच्या वेळी विद्युत दिवे बंद असल्याने चेंबरचा अंदाज न आल्याने मोठी वाहने आदळतात, तर दुचाकी अपघात होत आहेत.

- खुशी झा, पिसोळी.

बायपास मार्गे अवजड वाहनांसह इतर वाहने भरधाव वेगात असतात, त्यामुळे पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या चौकातून वाहने यू टर्न किंवा वळण घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पदपथ आणि पादचारी मार्ग नसल्याने वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

- सतीष घोडे, कामगार.

दरम्यान, महापालिकेच्या पथविभागातील म्हणाले की, कात्रज बायपास मार्ग अद्याप हस्तांतरित पालिकेकडे हस्तांतरित झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com