मदुराई एक्सप्रेसला खंडाळ्याजवळ अपघात, ​लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

भाऊ म्हाळस्कर
शुक्रवार, 6 जुलै 2018

लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई एक्सप्रेसला पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास खंडाळ्याजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून गाडीच्या शेवटच्या दोन बोगीचे नुकसान झाले आहे. 

लोणावळा : लोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराई एक्सप्रेसला पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास खंडाळ्याजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून गाडीच्या शेवटच्या दोन बोगीचे नुकसान झाले आहे. 

बोरघाटात गाडी लोणावळ्याकडे येत असताना गाडी ढकलण्यासाठी लावलेल्या इंजिनाची धडक बसल्याने गाडीचा शेवटचा डबा दुसऱ्या डब्यावर चढला. सुदैवाने जीवितहानी टळली. पहाटेच्या सुमारास रेल्वे गाड्यांची वर्दळ नसल्याने वाहतूक जास्त विस्कळीत झाली नाही. गाडीचे शेवटचे दोन डबे बाजूला केल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गाडी मदुराईकडे रवाना झाली. पुण्याहून सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस आज रद्द झाली. दुपारपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. 

​लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द-
पुणे-कर्जत पॅसेंजर
सिंहगड अप-डाऊन
इंटरसिटी डाऊन
प्रगती एक्सप्रेस 
भुसावळ-पुणे पॅसेंजर

Web Title: accident of madurai express near khandala