अपघातग्रस्त महिलेला ओळखताय का? पोलिसांना कळवा; मदतीचं आवाहन

women accident injured
women accident injured

लोणी काळभोर  - पुणे-सोलापुर महामार्गावर एका महिलेचा अपघात झाला असून तिच्यावर शिवम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तरवडी फाट्यावरील जे. के. सेल्ससमोर शनिवारी सकाळी बारा वाजणेच्या सुमारास अपघात झाला होता.

महिलेचं वय चाळीस ते पंचेचाळीस वर्ष असून, तिच्यावर शिवम हॉस्पिटील या खाजगी रुग्नालयातील अतिदक्षता विभागात उपचार चालु आहेत.  संबंधित अपघातग्रस्त महिलेस कोणी ओळखत असेल तर, तात्काळ लोणी काळभोर पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शऩिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अनोळखी महिला तरवडीफाट्यावरील जे. के. सेल्ससमोर आढळुन आली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने, पोलिसांनी तात्काळ वरील महिलेस जवळच्याच शिवम हॉस्पिटील या खाजगी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालय प्रशासनाने तिला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांनी अपघात झालेल्या घटनास्थळावरुन महिती घेतली असता, महिला एका पुरुषाबरोबर मोटारसायकलवरुन उरुळी कांचन बाजुकडे जात असताना अपघात झाल्याचे समजले आहे. मात्र अनोळखी महिलेबरोबर असणारा पुरुष फऱार झाल्याने, महिलेचे नाव अथवा पत्ताही समजलेला नाही. 

याबाबत बोलतांना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, अऩोळखी अपघातग्रस्त महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत. मात्र महिला अत्यावस्थ असल्याने ओळख पटविण्यात यश आलेले नाही. सदर महिलेचे चेहरा उभट असुन, वय साधारणतः  चाळीस ते पंचेचाळीस वर्षे आहे. महिलेच्या अंगावर आकाशी निळ्या रंगाचा टॉप असुन, उंचीही साडेचार ते पावणे पाच फुट इतकी आहे. महिलेबाबत अथवा अपघाताच्यावेळी महिलेसोबत असणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास, संबधितांनी तात्काळ लोणी काळभोर पोलिसाशी (लोकेश राऊत- 7972813399 मोबाईल नंबरवर अथवा 02026913260 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन बंडगर यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com