
Bhor News: मांढरदेवी मार्गावरील निळकंठ गावच्या हद्दीत शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. चंद्रकांत लक्ष्मण जावळे (वय ६०, रा. नीरा, ता. पुरंदर) व उत्तम गायकवाड (वय ४५, रा. नीलकंठ) यांचा अपघातात मृत्यू झाला.