घरी जाण्याच्या शाॅर्टकटने पत्नी, दोन मुलांचा मृत्यू, मोटारच कोसळली विहिरीत

घरी जाण्याच्या शाॅर्टकटने पत्नी, दोन मुलांचा मृत्यू, मोटारच कोसळली विहिरीत

उरुळी कांचन : अष्टापुर ग्रामपंचायत हद्दीतील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील एका रस्त्यालगतच्या विहिरीत मंगळवारी (ता. ९) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारुती इको ही चारचाकी पडली. वाहनातील 35 वर्षीय महिलेसह एक लहान मुलगी व मुलगा अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी वाहन पाण्यात पडले असतानाही, प्रसंगावधान दाखवत संबधित महिलेचा पती गाडीबाहेर पडल्याने, महिलेचा पतीचा जीव मात्र बचावला.

या अपघातात शितल सचिन कोतवाल (वय- ३५ वर्षे) यांच्यासह मुलगी सृष्टी (वय- ९ वर्षे) व शौर्य (वय ६ वर्षे) या मायलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर शितलचे पती सचिन श्रीहरी कोतवाल (वय- ४२ वर्षे) हे मात्र बचावले. दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शितल या, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल यांच्या सुनबाई असून, दोन लहान मुलासह सुनबाई गेल्याने अष्टापुर गावावर शोककळा पसरली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लोणीकंद पोलिस व कोतवाल कुटुंबाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सचिन व शितल हे आपल्या दोन मुलासह, शितल यांच्या माहेरी राहु (ता. दौड) येथे कामानिमित्त मंगळवारी दुपारी गेले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास राहुहुन अष्टापुर येथे मारुती इको गाडीतुन परत येत होते. कोसनंद-राहु रस्त्यावरुन अष्टापुर गावात जाण्यासाठी मुख्य मार्गाऐवजी सचिन यांनी, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळुन जाणारा जवळचा मार्ग पत्करला. आणि हाच मार्ग शितल व तिच्या मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन कोतलाल चालवत असलेली इको गाडी अष्टापुर गावाकडे जात असतांना, साडेदहा वाजनेच्या सुमारास एका वळणावर असलेल्या विहरीत इको गाडी कोसळली. विहीरीत पाणीसाठा मुबलक प्रमानात असल्याने, गाडीत पुर्णपणे बुडाली. गाडीबुडाल्याचे लक्षात येताच, सचिन यांनी प्रसंगसावधनता दाखवत गाडीचा दरवाजा उघडुन गाडीबाहेर पडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गाडीबाहेर पडताच, सचिन यांनी शितल व दोन्ही मुलांना गाडीबाहेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विहीरीत पाणी मोठ्या प्रमानात असल्याने, सचिन यांचे प्रयत्न अपुरे पडले. दरम्यान  सचिन यांनी विहीरीबाहेर येऊन घरी फोन करतानाच, मोठ- मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही आरडाओरड ऐकुन घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी विहीरीत उतरुन शितल व त्यांच्या दोन मुलांना बाहेर काढले. मात्र वरील तिघांना बाहेर काढण्यापूर्वीच तिघांचाही मृत्यु झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस घटनास्थळी पोचले होते. शितल यांच्यासह सृष्टी व शौर्य यांच्यावर बुधवारी सकाळी अष्टापुर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com