खासगी बसच्या धडकेत कर्मयोगी कारखाना संचालकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू | Indapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

खासगी बसच्या धडकेत कर्मयोगी कारखाना संचालकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू

इंदापूर : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीचे टायरफुटल्याने तो बदलत असताना मागून येणाऱ्या खाजगी बस चालकाचा ताबा सुटून ठोस लागल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले. या अपघातात कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक विश्वास रंगनाथ देवकाते यांचे चिरंजीवआदित्य ( वय १८ ) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव हद्दीत घडला. विश्वास रंगनाथ देवकाते (वय ४५ )आणि संतोष अंकुश पवार ( रा. मदनवाडी ता. इंदापूर जि.पुणे ) हे अपघातात जखमी झाले आहेत.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे गागरगांव गावच्या हद्दीत गुरूवारी दि.१८ रोजी रात्री साडेअकरा दरम्यान ऊसानेभरलेला ट्रॅक्टर ( क्र. एम.एच.४२ क्यू ४१२२) पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जात असताना पुढील ट्राॅलीचा टायर फुटला. हा टायर बदलत असताना पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी खाजगी बस ( क्र. एन.एल.०१ बी.१४४०) वरील चालकाचा ताबा सुटल्याने बसची ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्राॅली ( क्र. एम.एच.१४ एफ-८०४९) हिला पाठीमागून धडक बसली.

त्यामुळे विश्वास रंगनाथ देवकाते ,आदित्य विश्वास देवकाते आणि संतोष अंकुश पवार हे तिघेही जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे, पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना खाजगी वाहनाने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार कामी दाखल केले. उपचार सुरू असताना आदित्य देवकाते याचा मृत्यू झाला.

loading image
go to top