मुळशीकरांनो, 'या' रस्त्यावरून जाताना जरा जपून जा कारण...  

गोरख माझिरे
Monday, 14 September 2020

मुळशी तालुक्यात केंद्रीय निधीतून होत असलेल्या जालना ते दिघी बंदर रस्त्याच्या कामाची भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाकडेच्या रस्त्याच्या एका बाजूची दुरवस्था झाली आहे.

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्यात केंद्रीय निधीतून होत असलेल्या जालना ते दिघी बंदर रस्त्याच्या कामाची भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाकडेच्या रस्त्याच्या एका बाजूची दुरवस्था झाली आहे. येथे वाहन चालविणे अक्षरशः कठीण होऊन बसलेले आहे. पावसाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी वाहून आली असून, रस्त्यावर चिखल झाला आहे. पावसाचे पाणीही मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे येथे दररोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशी तालुक्यात चांदणी चौक ते दिघी बंदर या रस्त्याचे काम सुरू आहे. भूगाव व भुकूम परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याला प्राधान्य देऊन हा रस्ता प्रथम केला गेला. परंतु, लॉकडाउन व नंतर पावसामुळे रस्त्याच्या कामाला अडथळा आला. पावसाचे पाणी वाहण्यासाठी मोऱ्या करायच्या भागात काम रखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले, तर दुसऱ्या बाजूचे अर्धवट राहिले. अर्धवट राहिलेल्या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक, दिशादर्शक, रिफ्लेक्टर, लाल रिबन अथवा खासकरून रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या लक्षात येईल, असे सूचना फलक लावलेले नाहीत. त्यामुळे दररोज लहानमोठे अपघात घडत आहेत. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

भूगाव येथील हॉटेल गारवाजवळ एका बाजूचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट आहे. या भागात तीव्र उतारावर खडीही पसरली आहे. येथे दुचाकीस्वारांनी ब्रेक दाबल्यावर वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्याला प्राधान्य देऊन काम पूर्ण करावे व संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidents are happening due to delay in work on Konkan highway