Accused Arrested
sakal
माळेगाव - पणदरे (ता. बारामती) येथे गर्भवती महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर अंगावरील दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माळेगाव पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी सांगितली.