
उरुळी कांचन - अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्यानंतर तिच्यासोबत केलेल्या अश्लिल कृत्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लपून बसलेल्या आरोपीला २४ तासात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.