हिंगोलीत खून करून पळालेल्या आरोपीस पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुणे : दारू पिण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून नातेवाईकास दगडाने मारहाण करीत खून करून पुण्याला पळून आलेल्या आरोपीस खडकी पोलिसांनी पकडले. त्यास वाकडेवाडीतील पीएमपी कॉलनी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. 

पुणे : दारू पिण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून नातेवाईकास दगडाने मारहाण करीत खून करून पुण्याला पळून आलेल्या आरोपीस खडकी पोलिसांनी पकडले. त्यास वाकडेवाडीतील पीएमपी कॉलनी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. माधव तुमाराम टोमके (वय २९, रा. मळवटा, ता.वसमत, जि हिंगोली) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितिनुसार, खडकी पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी दुपारी वाकडेवाडी परिसरात गस्त घालीत होते. त्यावेळी पोलिसांना पाहून एक तरुण पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याने दारू पीत असताना झालेल्या वादातून नातेवाईक मधुकर उर्फ पांडुरंग ज्ञानेश्वर जाधव (वय ४५,रा. टाकळखोपा) यास दगडाने मारहाण करुन त्याचा खून केला. त्यानंतर तो पुण्याला पळून आला होता.

हिंगोली पोलिसांना गुंगारा देत तो वाकडेवाडी परीसर राहत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन हिंगोलीतील हट्टा पोलीसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused arrested in pune who escapes from Hingoli in murder case