पुणे - बंडगार्डन पोलिस ठाण्यातील तपास पथकाच्या खोलीतून आरोपी पसार झाल्याची घटना घडली. वैभव अनिल खोत (वय १९, रा. श्रमिकनगर, टिंगरेनगर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे..याप्रकरणी पोलिस अंमलदार शहाजी ठवाळ यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वैभव खोत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खोत याला एका गुन्ह्यात अटक करून पोलिस ठाण्यातील तपास पथकाच्या खोलीत बेडी लावून ठेवले होते. मात्र, रविवारी (ता. १९) पहाटे चारच्या सुमारास त्याने स्वतःचा हात बेडीतून अलगद बाहेर काढत मुख्य प्रवेशद्वारातून पळ काढला..या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण आरोपीचा शोध घेत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.