पुणे : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खुन करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन करणाऱ्या तरुणास न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली.
Court
Courtsakal media
Summary

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन करणाऱ्या तरुणास न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली.

पुणे - एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बलात्कार (Rape) करुन तिचा खुन (Murder) करणाऱ्या तरुणास न्यायालयाने (Court) जन्मठेप (Life Imprisonment) व दहा हजार रुपयांची दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली. अतिरीक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला. हि घटना सप्टेंबर 2012 मध्ये पाषाण येथे घडली होती.

आकाश नाथा कोळी (वय 19, रा. भेगडे चाळ, पाषाण) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाषाण परिसरात राहणारी 16 वर्षीय मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत होती. आकाश हा मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. 8 सप्टेंबर 2012 रोजी सायंकाळी साडे सात वाजता ती पाषाण येथील खासगी शिकवणीवरून पायी घरी येत होती. त्यावेळी आकाशने तिला अडवून तिच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने नकार दिला. तेव्हा त्याने, तिला जवळच्याच मोकळ्या मैदानात ओढत नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून तिचे नाक, तोंड दाबून तिचा खुन केला. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर कंपासपेटीतील कर्कटकने वार केले. त्यानंतर तो मुलीचा मोबाईल घेऊन तेथून पळून गेला.

दरम्यान, रात्री बराच उशीर झाला तरीही मुलगी घरी परत न आल्यामुळे तिच्या पालकांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दुसऱ्या दिशवी पाषाण येथील डीएससी क्वार्टर्सच्या मोकळ्या मैदानामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा चतुःशृंगी पोलिसांनी कसून तपास केला. त्यानंतर त्यांनी वडापावच्या गाडीवर काम करणाऱ्या आकाशला अटक केली. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्यात 19 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये नोडल ऑफिसर दत्ता अंगरे यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला खूनप्रकरणी जन्मठेप, दहा हजार रूपये दंड, बलात्कारप्रकरणी 10 वर्षे कारावास,5 हजार रूपये दंड व भारतीय दंड विधान कलम 404 नुसार तीन वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक सुभाष निकम यांनी केला. त्यांना पोलिस उपनिरीक्षक पगारे, सहायक उपनिरीक्षक कमलाकर गायकवाड, काळुराम रेणुसे, पोलिस कर्मचारी सतीश सोनवणे, निलेश पुकाळे यांनी सहाय्य केले.

असा घेतला आरोपीचा शोध

आकाश कोळी हा वडापावच्या गाडीवर काम करीत होता, त्यास ताडीचे व्यसन होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याने वर्तमानपत्रात मुलीचा फोटो आणि खुनाची बातमी वाचली, तेव्हा त्याने "माझ्याकडून मोठी चुक झाली' असे बोलून तो तेथून निघून गेला होता, असे पोलिस तपासात वडापाव गाडा चालक व ताडीगुत्ता मालकाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com