An accused in the murder of a garage owner in Kothrud has been arrested
An accused in the murder of a garage owner in Kothrud has been arrested

कोथरुडमध्ये गॅरेज मालकाच्या खुनाच्या घटनेतील एका आरोपीस अटक; 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: पूर्व वैमनस्यातून कोथरुडमध्ये भरदिवसा गॅरेज मालकावर धारदार शस्त्राने वार करुन झालेल्या खुनाच्या घटनेतील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने घटना घडल्यानंतर रात्री उशीरा अटक केली. 


प्रशांत मारुती बावधने (वय 21, रा.भिमनगर कोंढवे धावडे, उत्तमनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी अभिजित रमेश मंजीले त्याचे साथीदार राहुल सरकार, गणेश जाधव, सुरेश वाघमारे, अजय सूर्यवंशी, किरण गवारे व भैया यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर राकेश येमनपा क्षीरसागर (रा.लक्ष्मीनगर, डहाणुकर कॉलनी कोथरुड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील गांधी भवनसमोरील एका सोसायटीमध्ये असणाऱ्या एका गॅरेजचा मालक राकेश क्षीरसागर याचा सोमवारी दुपारी तीन वाजता 6 ते 7 जणांनी कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेचा कोथरूड पोलिस व गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक संयुक्त तपास करीत होते. युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, दिपक मते, पोलिस कर्मचारी रोहिदास लवांडे, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा यांचे पथक आरोपीच्या मागावर होते.

दरम्यान, पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड व विल्सन डिसोझा खुनाच्या घटनेतील संशयित आरोपी प्रशांत बावधने हा चांदणी चौकातील भुगाव रोडवर असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास तेथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बावधने याचा मित्र अभिजित मंजीले याची राकेश क्षीरसागर याच्याशी झालेले भांडणाच्या कारणावरून त्याने त्याचे साथीदार राहुल सरकार, गणेश जाधव, सुरेश वाघमारे, अजय सूर्यवंशी, किरण गवारे व भैया यांच्यासमवेत राकेशवर कोयत्याने वार करून खून केल्याचे सांगितले. आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी कोथरूड ठाण्यात सुपुर्द करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com