Pune Crime : दोन महिन्यांपासून फरार असणारा मोक्का गुन्ह्यातील आरोपी हत्यारासह जेरबंद

दोन महिन्यांपासून फरार असणारा मोक्का गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी हत्यारासह जेरबंद
accused of moca crime absconding for two months arrested along with weapon
accused of moca crime absconding for two months arrested along with weaponSakal

उरुळी कांचन : गेल्या दोन महिन्यांपासून फरार असणारा मोक्का गुन्ह्यातील आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी हत्यारासह जेरबंद केले आहे. तायप्पा मुसा जाधव (वय २१ वर्षे, रा. टाक्याचा माळ, रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोणी काळभोर (ता. हवेली) येथील टाक्याचा माळाशेजारील डोंगरावरील काळुबाई मंदिराजवळ एक इसम जवळ कोयता घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.

सदरची बातमी मिळताच त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे आणि त्यांचे पोलीस सहकारी पोचले असता वरील आरोपी संशयितरित्या थांबल्याचा आढळला. त्याची तपास पथकाकडून अंगझडती घेतली असता एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

त्याच्याविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७२४/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५, प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, आरोपी तायप्पा मुसा जाधव हा. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ६०३/२०२३ भा.दं.वि.क. ३०७, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), सह महाराष्ट्र पोलीस अधि.

१९५१ चे कलम ३७(१) (३), क्रिमिनल लॉ अमिटमेंट ३.७ अन्वये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२). ३(४) या मोक्याचे गुन्हयातील आरोपी असुन तो सुमारे दोन महिन्यांपासुन गुन्हा करुन फरार होता.

सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार सातपुते, गायकवाड, सायकर, जाधव, कुदळे, वीर, पाटील, शिरगीरे या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com