Baramati News : दौंड येथील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

खून केल्याचा गुन्हा सिध्द झाल्यानंतर पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे (रा. दौंड, जि. पुणे) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
accused sentenced to life imprisonment of daund murder case baramati
accused sentenced to life imprisonment of daund murder case baramatiSakal

बारामती- खून केल्याचा गुन्हा सिध्द झाल्यानंतर पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे (रा. दौंड, जि. पुणे) यास बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

4 जून 2017 रोजी गोपालसिंग गुद्दरसिंग (रा.परीहार रा. मूळ जलाला ता. घाटमपूर, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा पाठीत चाकूने वार करुन खून केला अशी फिर्याद त्याचा मेव्हणा सुमितसिंग जगदिशसिंग बदोरीया (रा. मूळ भराईपुरा ता. साखरी, जि. भिंड, मध्यप्रदेश) याने दौंड पोलिस ठाण्यात दिली होती.

सदर प्रकरणाचा तपास दौंड पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी केला गुन्हा घडल्यापासून आरोपी न्यायालयीन बंदी होता. आरोपी पांडुरंग काकडे आणि गोपाळसिंग परीहार हे रेल्वेमध्ये चहा व पाणी विकण्याचे काम करीत असत. त्यावरुन त्यांचे वादविवाद होते व त्यावरुनच आरोपीने गोपाळसिंग परीहार यांचा खून केला केला होता.

सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यातील काही साक्षीदार परराज्यातील असल्याने साक्षीदार न्यायालयात साक्षीसाठी आणण्यासाठी सरकार पक्ष व पोलीस यंत्रणा यांना खूप परीश्रम घ्यावे लागले. दौंड उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैदयकीय अधिकारी डॉ. बी. के. बागल यांचा न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला.

सरकारी वकील प्रसन्न जोशी यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदर खटल्यामध्ये कोर्ट पैरवी एस.आय नलवडे, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार आर. डी. जगताप यांनी सहकार्य केले.

- मिलिंद संगई, बारामती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com