सासवडमध्ये आज रंगणार अत्रे मराठी साहित्य संमेलन

सासवडमध्ये आज रंगणार 
अत्रे मराठी साहित्य संमेलन
Published on

गराडे, ता. १२ : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची १२८व्या जयंती निमित्ताने सासवड (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (ता. १३) आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे २९ वे मराठी साहित्य संमेलन होत असल्याची माहिती आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे यांनी दिली.
सकाळी साडेनऊ वाजता जेजुरी नाका येथील आचार्य अत्रे यांच्या अर्ध पुतळ्यास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्‍घाटन करण्यात येईल. त्यानंतर आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. केशव मुगुटराव काकडे यांचे स्वागताध्यक्षीय भाषण होईल. त्यानंतर भरणे हे संमेलनाला संबोधित करतील. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील हे अध्यक्ष भाषण करतील.
दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान परिसंवादाचा कार्यक्रम आहे. ‘साहित्यातील लोकजीवन’ हा परिसंवादाचा विषय असेल. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. केशव देशमुख उपस्थित असतील, तर डॉ. अतुल चौरे, डॉ. अमोगसिद्ध चेडके यांचा यात सहभाग असेल. दुपारी दोन ते चार या वेळेत रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. दुपारी ४ ते ४.३० या वेळात संमेलनाचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांचे अध्यक्ष भाषणाने संमेलनाचा समारोप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com