पुणे : खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन हजार ३५९ कोटींचे कर्ज वाटप
Rajesh-Deshmukh
Rajesh-Deshmukh

पुणे : जिल्ह्यातील बॅंकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘एफआयडीडी’ चे व्यवस्थापक पियुष गोयल, नाबार्डचे रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपमहाव्यवस्थापक वीणा राव, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडू पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध बॅंकांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप आणि विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठी वर्षाच्या सुरवातीपासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, जेणेकरून उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी सरकारी योजनांबाबत विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात येईल.

कोरोनाच्या कालावधीतही जिल्ह्यातील बॅंकांनी समाधानकारक काम केले आहे. किसान क्रेडीट कार्ड (पीक कर्ज) खरिपाचे दोन हजार ३५८ कोटी ८३ लाख वाटप केले आहे. ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे ही शेतकऱ्यांच्यादृष्टीने समाधानाची बाब आहे. खरीप कर्जवाटपाचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी सूक्ष्म नियोजन करावे. पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत १६ सप्टेंबर रोजी शिबिर आयोजित करावे. युवकांना स्वयंरोजगारासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध बॅंकांच्या प्रतिनिधींनी मागील सहा महिन्यांच्या कामकाजाचा आढावा या वेळी सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com